शिंदखेड्यात सर्वात मोठे मंगल कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:15 IST2020-02-25T12:14:56+5:302020-02-25T12:15:30+5:30

तेली समाज : स्रेह मेळाव्यात विजय चौधरी यांचे आश्वासन

The largest Mars office in Shindkheda | शिंदखेड्यात सर्वात मोठे मंगल कार्यालय

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तेली समाजाचे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंगल कार्यालय शिंदखेडा शहरात होणाऱ यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष विजय वसंतलाल चौधरी यांनी दिले़
बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडी व महिला आघाडी तर्फे तेली समाज स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी म्हाडा उपसभापती बबन चौधरी, मा स्थायी समिती सभापती सतिष महाले, चोपडा येथील नगराध्यक्ष जीवन चौधरी, गुरुशिष्य स्मारक समिती अध्यक्ष कमलाकर अहिरराव, तैलिक युवक महासभेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय चौधरी, तैलिक युवक महासभेचे धुळे जिल्हाध्यक्ष नरेंद्र चौधरी, सरपंच मोहनराव चौधरी, जिप सदस्य वैशाली चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, भाजपा ओ बी सी मोर्चा जिल्हाध्यक्ष धुळे बबनराव चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण एस के तेली यांनी केले. युवक महासभेच्या धुळे जिल्हाउपाध्यक्ष पदी विजय भाऊराव चौधरी यांची निवड होऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडीची शिंदखेडा तालुका, शहर व महिला आघाडी शिंदखेडा तालुका, शहर कार्यकारिणीची निवड करण्यात येऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले शिंदखेडा शहर अध्यक्ष पदी चंद्रशेखर चौधरी यांची निवड करण्यात आली आहे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी सौ उषाबाई प्रकाश चौधरी, शहर अध्यक्ष पदी सौ गुंजन अरुण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समाज प्रगतीसाठी, समाज हितासाठी नेहमी प्रयत्नशील असलेले समाजातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक चंद्रशेखर चौधरी यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडी, महिला आघाडी शिंदखेडा शहर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चौधरी, संदीप चौधरी तर आभार विजय चौधरी यांनी मानले.

Web Title: The largest Mars office in Shindkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे