वारुड येथे लोटनदादा यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:42 IST2020-02-08T13:41:54+5:302020-02-08T13:42:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वारुड : शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथील लोटन दादा देवस्थानच्या यात्रोत्सवाला ७ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त ...

Laotanada Dada Yatra starts at Warud | वारुड येथे लोटनदादा यात्रोत्सवाला प्रारंभ

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
वारुड : शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथील लोटन दादा देवस्थानच्या यात्रोत्सवाला ७ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.
वारूड येथे गुलझार नदीच्या पुर्व दिशेस वसलेले लोटन दादाचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापना १९७७ मध्ये झाली. या मंदिराच्या पुर्व दिशेस दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे. त्या मंदिराची स्थापना १९८२ मध्ये करण्यात आली आहे. त्या मंदिराच्या बाहेरील बाजूस सर्पखांब आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी टाळ-मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. यात्रोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी भाविक नवस फेडतात. त्यासाठी गोड भोजनाचा नैवेद्य असतो. भोजन तयार करण्यासाठी ग्रा.पं.तर्फे जागा उपब्लध करून देण्यात आली. यात्रोत्सवात विविध व्यावसायिकांनी थाटले आहेत. सरपंच आरती पिंपळे, उपसरपंच आशाबाई भदाणे, दत्तात्रय दोरीक, तंटामुक्ती अध्यक्ष भालेराव बेहेर, पोलीस पाटील जितेंद्र बेहेरे, ग्रा.पं. सदस्य सुमनबाई दोरीक, विमलबाई पवार, प्रतिभा सोनवणे, वैशाली धाडे, हिराबाई आखाडे, कमलबाई चव्हाण, सुनंदा चव्हाण, विजय पवार, दिनेश बोरसे, राजेंद्र बोरसे, श्रावण पिंपळे, ग्रामविस्तार अधिकारी गणेश पाटील, लोटन दादा ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: Laotanada Dada Yatra starts at Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे