भाषेचे अध्ययन समाजातून व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:12 PM2020-01-20T23:12:50+5:302020-01-20T23:13:20+5:30

मिलिंद दुसाने : सोशल मिडीयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत प्रतिपादन

The language should be studied by the community | भाषेचे अध्ययन समाजातून व्हावे

Dhule

Next

धुळे : भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ व्याकरण, लिपीचा अभ्यास नसतो, तो एका सम्पूर्ण संस्कृतीचा अभ्यास असतो. आपण जे ज्ञान प्राप्त करतो ते ही कोणत्या तरी भाषेतच असते, म्हणून भाषेचे समय शिक्षण असणे आवश्यक आहे. भाषा प्रसारात माध्यमांची मोठी भूमिका असल्याचे मत अकोला येथील जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.
एसएसव्हीपीएस महाविद्यालय आणि एल्टाई खान्देश चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मिडिया' या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी अक्षस्थानी उमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मोहन पावरा होते़सूत्रसंचालन प्रा. डॉ. सरबजीत चीमा यांनी, परिचय प्रा. डॉ. उमेश पाटील यांनी, तर आभार प्रा. सदाशिव राणे यांनी केले.
सदर कार्यशाळा प्रथम सत्रामध्ये जयहिंंद महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वर्षा पाटील यांनी सोशल मिडिया चा इंग्रजी शिकण्यासाठी विविध क्लुक्त् कशा वापराव्या याविषयी मार्गदर्शन केले. दवितीय सत्रामध्ये मुंबईस्थित प्रा. निलेश पाठक यांनी सोशल मिडिया मधील इंग्रजी भाषेचा वापर कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. तृतीय स्त्रामध्ये म्हसदी येथील प्रा. डॉ. हेमंत पाटील यांनी विविध सोशल साईट, वेब साईट, अप्स इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. चतुर्थ सत्रामध्ये प्रा. डॉ. दीपक चौधरी यांनी मार्गदर्शन केले. समारोप सूत्रसंचालन प्रा. दीपक देवरे तर आभार सपना शाह यांनी मानले.
यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अमोल पाटील, पतिंगराव भदाणे, मोनल जैन, विशाखा भदाणे, चेतन शाह, प्रा. किशोर ठाकरे, नितीन कापडीस, प्रा. निलेश चित्ते, प्रा. सुषमा सबनीस, भाग्यश्री वाल्हे, प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी परिश्रम घेतले. तर इंग्रजी भाषेचे महत्व बद्दल प्रा. डॉ. वैभव सबनीस यांनी सांगितले.

Web Title: The language should be studied by the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे