मोबाईल रेंजअभावी ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:30+5:302021-07-20T04:24:30+5:30
धुळे : तालुक्यातील सांजोरी गावात मोबाईलला रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे गावात मोबाईल टाॅवर उभारावा अशी ...

मोबाईल रेंजअभावी ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा
धुळे : तालुक्यातील सांजोरी गावात मोबाईलला रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे गावात मोबाईल टाॅवर उभारावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सांजोरी ग्रामस्थांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गावात सुमारे दीडशे ते दोनशे विद्यार्थी आहेत. सध्या लहान मुलांच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. परंतु मोबाईलला रेंज नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. गावात कोणत्याच कंपनीचा मोबाईल टाॅवर नसल्याने ही समस्या आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील मोबाईल रेंजअभावी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नातेवाईकांशी तसेच एकमेकांशी संपर्क होत नाही. त्यामुळे गैरसोय होते.
निवेदनावर मोतीलाल आत्माराम पाटील, किशोर आधार पाटील, संदीप लोटन पाटील, बाबूलाल आत्माराम पाटील, हिरालाल दगडू पाटील, संजय बारकू पाटील, गितेंद्र युवराज पाटील, बळीराम रामभाऊ पाटील, रोहिदास घुगे, विनायक बाबूलाल पाटील, हितेश नंदलाल पाटील, भानुदास विनायक मगर, प्रकाश भटू जगताप यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदनात ग्रामस्थांनी आपले मोबाईल क्रमांक देखील दिले आहेत.