साईबाबा नगरात मूलभूत सोयींचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:40 IST2019-11-18T11:39:08+5:302019-11-18T11:40:19+5:30

वलवाडी : मनपासह नगरसेवकांचे दुर्लक्ष

 Lack of basic facilities in Saibaba city | साईबाबा नगरात मूलभूत सोयींचा अभाव

dhule

धुळे : शहर हद्दीत समावेश करण्यात आलेल्या १० गावापैकी मोठ्या लोकवस्तीचे वलवाडी गावाला मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ साईकृपा नगरातील नागरी सुविधा सोडविण्याबाबत नगरसेवकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे़
वलवाडी शिवारात रुपामाई शाळेजवळील साईकृपा नगरात नागरिकांना अनेक वर्षापासून मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ प्रभागातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने पावसाचे व सांडपाणी रस्त्यावर साचते़ त्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने रस्त्यावरून चालण्यासाठी अडचणीचे ठरते़ काही दिवसापासून पावसाचे विश्राती घेतली आहे़ तरी देखील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, घंटागाड्या, भाजीविक्रेते येत नाही़ त्यामुळे मुलांना शाळेत पोहचविण्यासाठी सोडण्यासाठी जावे लागते़

Web Title:  Lack of basic facilities in Saibaba city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे