श्रमसाफल्य पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:22 IST2020-02-17T12:21:30+5:302020-02-17T12:22:01+5:30
दोंडाईचा : स्वातंत्र्य सेनानी डॉ.पी.व्ही. सोहोनी जन्मशताब्दी कार्यक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : येथील स्वातंत्र सेनानी डॉ.पी.व्ही. सोहोनी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील डॉ.अभिजित सोनवणे यांना श्रमसाफल्य पुरस्कार तर शहादा येथील बालरोगतज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दोडाईचा येथील डॉ.पी.व्ही. सोहोनी फाऊंडेशनमार्फत ८ वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात आहे.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड होते. याप्रसंगी डॉ.मुकुंद सोहोनी, डॉ.अनिल सोहोनी, अनुराधा सोहोनी, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सरकरसाहेब रावल, डॉ.रवींद्र टोनगावकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास विविध सामाजिक क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘हृदयाचे आरोग्य’ पुस्तिकेचे प्रकाशन हैदरभाई नुराणी, हुकमचंद कुचेरीया यांच्याहस्ते करण्यात आले.
पुणे येथील डॉ.अभिजित सोनवणे हे धार्मिक स्थळाजवळ बसलेल्या भिक्षेकरींची मोफत तपासणी करुन औषधोपचार, शस्त्रक्रिया करीत असतात. तसेच त्यांना वृद्धाश्रमात दाखल करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन फाउंडेशनने यावर्षीचा श्रमसाफल्य पुरस्कार दिला आहे.