कुसुंबा, शिरुड येथे पोलीस ठाणे व्हावे

By Admin | Updated: May 3, 2017 15:50 IST2017-05-03T15:50:16+5:302017-05-03T15:50:16+5:30

शरद पाटील यांचे गृह विभागाच्या उपसचिवांना निवेदन

Kusumba, Shirud, to be the police station | कुसुंबा, शिरुड येथे पोलीस ठाणे व्हावे

कुसुंबा, शिरुड येथे पोलीस ठाणे व्हावे

 धुळे,दि.3- धुळे ग्रामीण मतदारसंघाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तालुक्यातील कुसुंबा व शिरुड येथे नव्याने 2 पोलीस ठाणे स्थापन्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात कुसुंबा येथे पोलीस ठाणे तयार करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी दिली. 

राज्याच्या गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट यांना या संदर्भात नुकतेच निवेदन देऊन दोन्ही पोलीस ठाणे व कर्मचारी निवास बांधण्यासाठी निधीत तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे ग्रामीण मतदार संघाचा विस्तार व कार्यक्षेत्र वाढले असून नव्याने या मतदार संघात 40 खेडय़ांचा समावेश झाला आहे. शिवाय तो शहरालगत असल्याने शहरातील नागरिकांचे वास्तव्य शहरालगतच्या खेडय़ांमध्ये वाढत आहे.

Web Title: Kusumba, Shirud, to be the police station