वडजाई येथील कोल्हापुरी बंधारा ओव्हर फ्लो; परंतु गळतीमुळे धबधब्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:37+5:302021-09-11T04:37:37+5:30
मात्र मोठी गती लाभल्यामुळे धबधब्याचे स्वरूप आले आहे. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी गेल्या वर्षी मोठी गर्दी केली होती; ...

वडजाई येथील कोल्हापुरी बंधारा ओव्हर फ्लो; परंतु गळतीमुळे धबधब्याचे स्वरूप
मात्र मोठी गती लाभल्यामुळे धबधब्याचे स्वरूप आले आहे. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी गेल्या वर्षी मोठी गर्दी केली होती; परंतु या बंधाऱ्याच्या पाण्यात एका तरुणाला बुडून प्राण गमवावा लागला होता.
वडजाई गावापासून एक किलोमीटर अंतरावर उत्तरेस कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. लहान लहान बंधारे आहेत; परंतु साठवणक्षमता या बंधाऱ्याची जास्त असल्यामुळे गावासाठी पाणीटंचाई भासू नये म्हणून या बधाऱ्याचा मोठा फायदा होत असतो. डेडरगाव तलाव व रानमळा तलावाचा सांडवा निघाला की, त्याचे पाणी या कोल्हापुरी बंधाऱ्यात साठायला सुरुवात होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील लहान-मोठे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. त्या-त्या कोल्हापुरी बंधाऱ्याला मोठी गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. हा बंधारा उंच असल्यामुळे किनाऱ्याने पडणारे पाणी हे धबधब्यासारखे पडत असून ते पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. केटिवेअरमध्ये पाणी साठा जास्त असल्यामुळे काही तरुण येथे पोहण्यासाठी येत होते. मात्र, बंधारा जुनाट असल्यामुळे तो जीर्ण झाला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी याच बंधाऱ्यात पोहण्यासाठी आलेल्या धुळे येथील एका तरुणाचा दिनांक २४ ऑगस्ट रोजी धरणात बुडून मृत्यू झाला होता. त्यावेळी मोहाडी पोलिसांनी या ठिकाणी येण्यास बंदी घातली होती. मात्र, या बंदीला न जुमानता लोकांनी मोठ्या प्रमाणात धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मोहाडी पोलिसांनी काही तरी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
100921\img_20210908_180858.jpg
वडजाई येथील बंधारा ओव्हरफ्लो मात्र किनार्याने लागली गळती धबधब्याचे स्वरूप