खुडाणे जि. प. शाळेत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST2021-07-30T04:37:42+5:302021-07-30T04:37:42+5:30
खुडाणे येथील सेवानिवृत्त प्रा. मधुकर रामचंद्र जगताप यांची ही संकल्पना होती. वर्षभरापूर्वी बाहेरून काड्या आणून त्यांच्या शेतात त्यांना ...

खुडाणे जि. प. शाळेत वृक्षारोपण
खुडाणे येथील सेवानिवृत्त प्रा. मधुकर रामचंद्र जगताप यांची ही संकल्पना होती. वर्षभरापूर्वी बाहेरून काड्या आणून त्यांच्या शेतात त्यांना वाढवून पिंपळ, नारळ, आवळा, पाम, अशोका, गोल्डन बिरोंडाची मोठी रोपे तयार केली.
तत्कालीन शिक्षक स्व. धोंडू सोनू राणे यांच प्रति आदर व्यक्त करीत शाळेला अधिक सुशोभित करण्याचा हेतू ठेवून लोकसहभागातून त्यांनी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी डॉ. प्रकाश आसाराम गवळे, विजयसिंह जतनसिह राऊळ, ह. भ. प. पांडू आप्पा, माजी सरपंच शरद परशराम गवळे, उद्योजक देवाची भुरू वंजारी, दादा सीताराम गवळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गवळे, मधुकर वाघ, ग्रामपंचायत सदस्य विजय बावणे, कन्हैयालाल काळे, मुख्याध्यापिका सावंत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.