खान्देशचा आवाज ‘लोकमत’ने बुलंद केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:41+5:302021-09-02T05:17:41+5:30
धुळे : औद्योगिक असो, अथवा सिंचनसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे, तसेच सर्वसामान्यांचा आवाज शासन, प्रशासनापर्यंत पोहचवून त्यांना न्याय ...

खान्देशचा आवाज ‘लोकमत’ने बुलंद केला
धुळे : औद्योगिक असो, अथवा सिंचनसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे, तसेच सर्वसामान्यांचा आवाज शासन, प्रशासनापर्यंत पोहचवून त्यांना न्याय देण्याची काम ‘लोकमत’ने केले आहे. खान्देशचा आवाज बुलंद करण्याचे प्रयत्न ‘लोकमत’ने केल्याचे गौरवोद्गार आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांनी काढले.
‘लोकमत’च्या धुळे जिल्हा कार्यालयाचा ३७ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी सायंकाळी केशरानंद मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर धुळे शहराचे आमदार फारूख शाह,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॅा. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नगरसेवक शीतल नवले, आयुक्त अजीज शेख, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘पुनश्च भरारी’ या पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे जग जागच्या जागेवर थांबले. या महामारीचा अनेक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. समाज माध्यमावर विविध माहिती प्रसारित होत होती. मात्र अशा संकटाच्या काळातही मुद्रित माध्यमातून शाश्वत सत्य समजत होते.
आज जिथे मराठी तिथे लोकमत पोहचलेला आहे. आपल्या निर्भीड लिखाणामुळे ‘लोकमत’ जनमानसापर्यंत पोहचलेला आहे. कोणीजण कुठे चुकत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देण्याचे कामही ‘लोकमत’ने केल्याचे त्यांनी नमूद केले.
‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवी टाले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, कोरोनाच्या संकटाच्या काळात ‘लोकमत’ने स्वत:मध्ये आमुलाग्र बदल केले. नवनवीन संकल्पना राबविल्या. नवनवीन विषय हाताळून जनतेच्या आकांक्षा पूर्ण केल्या. या संकटाच्या काळात मुद्रित माध्यमांची विश्वसनियता अधिक उजळून निघाली.
कोराेनाचा फटका मुद्रित माध्यमालाही मोठ्या प्रमाणात बसला. असे असतांनाही ‘लोकमत’ने या संकटाला यशस्वीपणे तोंड दिले.
सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर व रवींद्र पाटील यांनी तर आभार धुळे जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र शर्मा यांनी मानले.
आम्ही ‘सखी मंच’चे चाहते : चित्रा वाघ
लोकमत केवळ वृत्तपत्रच नाही तर ते एक समाजाचा घटकच बसलेले आहे. आमची सुरवातच ‘लोकमत’वाचून सुरू होते. एक दर्जेदार वर्तमान वाचल्याचे समाधान मिळते. ‘लोकमत’ने नेहमीच सत्याचीच बाजू घेतलेली आहे. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. दरम्यान आम्ही खरे तर ‘सखी मंच’चे जास्त चाहते आहोत. सखीमंचमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळालेले आहे. महिलांच्या विविध समस्यांविषयी विचारमंथन सखीमंचमधून होत असते. याशिवाय महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावरही प्रकाश टाकलेला असतो. एवढेच नाही तर महिलांना आवडणारे ‘चटपट रेसीपी’बद्दलही यात विशेष माहिती असते. त्यामुळे सखीमंच खूप आवडते असा आवजुर्न उल्लेख भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मनोगतातून केला.
‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव
शहरासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे ‘लाेकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यात खासदार डॅा. सुभाष भामरे, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, शिरपुरचे आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,खुर्शिदभाई कादीयानी (दोंडाईचा), माजी आमदार प्रा.शरद पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, चिमठाणे गटाचे जि.प.सदस्य वीरेंद्रसिंग गिरासे, शिंदखेडा उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी जि.प.सदस्य छोटू पाटील, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, स्थायी समिती सभापती संजय जाधव आदी उपस्थित होते.