खान्देश तेली समाजातर्फे वधू-वर पालक परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:13+5:302021-09-05T04:40:13+5:30
धुळ्यासह प्रत्येक जिल्ह्यातील व राज्यातील खान्देश तेली समाजातर्फे दरवर्षी वधू-वर पालक परिचय मेळावा घेण्यात येत असतो. त्यासाठी वधू-वर ...

खान्देश तेली समाजातर्फे वधू-वर पालक परिचय मेळावा
धुळ्यासह प्रत्येक जिल्ह्यातील व राज्यातील खान्देश तेली समाजातर्फे दरवर्षी वधू-वर पालक परिचय मेळावा घेण्यात येत असतो. त्यासाठी वधू-वर परिचय अर्ज वाटप सुरू केले आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात मेळाव्याचे फाॅर्म वाटप होत आहे. तसेच कोरोनाच्या या महामारीमुळे कार्यक्रम हा नियमानुसार घेण्यात येणार असून प्रत्येक गावामध्ये खान्देशी तेली समाजतर्फे वधू-वर परिचय पालक मेळावाचे फाॅर्म वाटप सुरू आहे.
या मेळाव्यासाठी खान्देश तेली समाज मडळ अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजू चौधरी, तालुका अध्यक्ष भटू चौधरी व नवयुवक आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष सुनील चौधरी सहकार्य करीत आहेत. या वर्षी वधू-वर परिचय मेळाव्यासाठी खान्देश तेली समाज बांधवांनी जस्तीत जास्त नावनोंदणी करावी व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील चौधरी, नवयुवक आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्षांनी केले आहे.