खलाणे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:26+5:302021-04-25T04:35:26+5:30
खलाणे ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळावा याकरिता संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करून मागणी करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेऊन ...

खलाणे ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
खलाणे ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळावा याकरिता संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करून मागणी करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेऊन आयएसओ मानांकनाचे पुणे विभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष खलाणे ग्रामपंचायतीची पाहणी करून आयएसओ मानांकनचे सर्व नियमात बसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी आयएसओ मानांकनचे दर्जा देण्यात आला आहे.
सदर ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळावे याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाची मांडणी व विविध दस्तावेजची सुशोभित मांडणी, ग्रामस्थांची कामे तातडीने मार्गी लावणे, गावातील रस्ते, सांडपाणीचे नियोजन, शुद्ध पाण्यासाठी दोन आरओ फिल्टरचे नियोजन, तसेच गावात स्वच्छता राखावी म्हणून घंटागाडीचे नियोजन, जि. प. मराठी शाळा दुरुस्ती,
हायमास्ट लॅम्प आदिवासी वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले, शॉपिंग सेंटर दुरुस्ती करण्यात आली आदी विविध सर्व कामे करण्यात आली आणि हेच संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करण्यात आली.तसेच भविष्यात विकासकामाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी सरपंच रत्नाबाई भिल, उपसरपंच संजय वाल्हे, गट प्रमुख महेंद्र देसले, ग्रामसेवक डी. एन. पवार, पोलीसपाटील मनोहर भदाणे , ग्रामपंचायत सदस्य नीताबाई देसले, पूनमबाई भदाणे, संगीताबाई वाल्हे, रिताबााई भामरे, अनिता देसले, चिंधाबाई वााघ, कमलबाई गिरासे, योगीताबाई वाघ, रोशन टाटिया, गोटुसिंग गिरासे, किशोर भिल आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.