रमजान ईदपर्यंत बाजार बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 14:20 IST2020-05-14T14:20:12+5:302020-05-14T14:20:35+5:30
खादीम फाउंडेशन : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोराना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रमजान ईदपर्यंत बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देवू नये अशी मागणी खादीम फाऊंडेशनने केली आहे़ खादीम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून ही मागणी केली आहे़ निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ अशा बिकट परिस्थितीत पवित्र रमजान ईदचा सण २५ तारखेला साजरा होत आहे़
या सणाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजातील कुटूंबे अत्यावश्यक वस्तुंसह इतरही वस्तुंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात़ लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात बाजारपेठा उघडण्यास परवानगी दिली तर लोक कपडे, बूट, चप्पलसह इतर वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या गर्दीत एखादा बाधित रुग्ण असला आणि सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा पाळली गेली नाही तर सध्यापेक्षाही बिकट परिस्थिती उद्भवू शकते़
नागरिकांना सुरक्षीत ठेवण्यासाठी शासन, प्रशासन, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या लढ्यात अहोरात्र काम करीत आहेत़ कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी होऊ न देणे हा एकमेव पर्याय असल्याने घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे़
यापुढे जावून रमजान ईदपर्यंत बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देवू नये अशी मागणी खादीम फाऊंडेशनचे अध्यक्ष तारिक शाह, उपाध्यक्ष मजहर शेख, सचिव मजहर मिर्झा, सह सचिव अल्ताफ शाह, खजिनदार जाविद शाह, सह खजिनदार वासिम शेख, इम्तियाज पठाण, सादिक शेख, अशपाक शाह, शकील मिर्झा, अकील शेख, जाविद पठाण, दस्तगीर शेख, विकार शाह, सईद कुरेशी, मोयोद्दिन शाह, रियाज शाह, नासिर शाह, मुश्ताक शेख, अमजद शाह, जाकिर शाह आदींनी केली आहे़