कर्ले फिडरचा वीजपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:30 IST2019-03-08T22:29:16+5:302019-03-08T22:30:19+5:30

रात्र काढावी लागते जागून : शेतकरी हैराण; बिघाड रात्रीच दुरुस्त करण्याची मागणी

 Karl Feeder's power supply disrupted | कर्ले फिडरचा वीजपुरवठा विस्कळीत

dhule

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील वीज उपकेंद्रातील कर्ले फिडरचा विजपुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकरी रात्रभर जागून काढतात. किरकोळ तांत्रिक बिघाड रात्री शोधत नसतील तर शेतकऱ्यांना रात्री विजपुरवठा करतातच कशाला? असा प्रतिप्रश्न शेतकऱ्यांमधून निर्माण होत आहे. मालपूर येथील वीज उपकेंद्रातून स्वतंत्र कर्ले फिडर असून यावरील विजपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून येथील शेतकरी विजे अभावी रात्र जागून काढत आहेत. वीज उपकेंद्र झाल्यानंतर समस्या मार्गी लागतील अशा आशा होत्या मात्र त्या फोल ठरत आहेत.

Web Title:  Karl Feeder's power supply disrupted

टॅग्स :Dhuleधुळे