थाळनेर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:34+5:302021-07-29T04:35:34+5:30
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. जे. गावीत होते. डॉ.गावीत आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कारगिल युद्धाच्या प्रसंगी शत्रू उंच पर्वत ...

थाळनेर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. जे. गावीत होते. डॉ.गावीत आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कारगिल युद्धाच्या प्रसंगी शत्रू उंच पर्वत शिखरांवर दबा धरून होता, तर भारतीय सैन्य या अदृश्य शत्रूसोबत लढा देत होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सेनेने विजय मिळवला होता. आजचा दिवस आपल्या शूर जवानांचा शौर्यगाथेला उजाळा देण्याचा व त्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा दिवस आहे. या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले तर १३०० पेक्षा अधिक जवान जखमी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. झुंजारराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एम. बोरसे यांनी केले. रासेयो विभागाचे सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.डी. रणदिवे यांच्या मार्गदर्शनात शहीद जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.