कोरीव कामातून साकारते कानुमाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:19 IST2019-07-26T22:18:42+5:302019-07-26T22:19:01+5:30

वर्शी : मूर्ती घडविण्याच्या कामाला येथील कारागिरांनी दिला वेग

Kanumata carries on the carved work | कोरीव कामातून साकारते कानुमाता

लाकडावर कोरीव काम करुन कानुमातेच्या मूर्तीवर श्रृंगार चढवितांना प्रकाश मिस्तरी, कपिल चौधरी व स्वप्निल चौधरी.

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्शी : खान्देशात श्रावण महिन्यातील रविवारी ठिकठिकाणी कानुमातेची स्थापना करण्यात येते. हा उत्सव जवळच येऊन ठेपल्याने येथील कारागिरांनीही कामाला वेग दिला आहे. येथे कुठल्याही अत्याधुनिक मशिनरीचा वापर न करता लाकडावर कोरीव काम करुन कानुमातेची मूर्ती साकारली जाते.
गावातील सुतार काम करणारे प्रकाश दगा सुर्यवंशी हे लाकडावर कोरीव काम करुन कानुमातेची साकारतात. त्यांना मूर्ती बनविण्यासाठी किमान ८ ते १० दिवस लागतात. 
मूर्ती घडविण्यासाठी सुमारे ५ ते ६ हजारापर्यंत खर्च येतो. सर्व सजावटीसह १२ ते १३ हजारापर्यंत खर्च होतो. मूर्तीवर चढविलेला श्रृंगार लक्ष वेधून घेतो. मूर्ती बनवायची असल्याने भाविकांना किमान एक ते दीड महिना अगोदर सांगावे लागते. त्यांनी घडविलेल्या मूर्ती साक्री, शिरपूर, शिंदखेडा, यावल, पारोळा तालुक्यात गेल्या आहेत. 

Web Title: Kanumata carries on the carved work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे