स्थायी सभापतीपदी कैलास चौधरी निश्चित

By Admin | Updated: January 14, 2017 00:27 IST2017-01-14T00:27:46+5:302017-01-14T00:27:46+5:30

धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांची निवड निश्चित झाली आह़े

Kailash Chaudhary, standing for the post of Standing Chairman | स्थायी सभापतीपदी कैलास चौधरी निश्चित

स्थायी सभापतीपदी कैलास चौधरी निश्चित

धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांची निवड निश्चित झाली आह़े तर महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदांची निवड बिनविरोध झाली असून केवळ घोषणा बाकी असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाल़े
मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी शुक्रवारी नामनिर्देशन पत्र घेणे आणि दाखल करण्याची अंतिम मुदत होती़ या मुदतीत राष्ट्रवादीचे कैलास चौधरी आणि भाजपतर्फे बालिबेन मंडोरे यांनी नामनिर्देशन पत्र नगरसचिव मनोज वाघ यांच्याकडे सादर केल़े महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आह़े त्यामुळे कैलास चौधरी यांचे नाव निश्चित झाले आह़े
महिला सभापतीपद
महापालिकेच्या महिला सभापती आणि उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती़ विहित मुदतीत सभापतीपदासाठी इंदुबाई वाघ आणि उपसभापती पदासाठी चंद्रकला जाधव यांनीच अर्ज सादर केल़े दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे असून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही़ परिणामी दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत़ दरम्यान, स्थायी आणि महिला सभापती पदावर सोमवार 16 रोजी शिक्कामोर्तब होणार आह़े

Web Title: Kailash Chaudhary, standing for the post of Standing Chairman