जम्बो ओपीडीत हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधितांना रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:20+5:302021-05-16T04:35:20+5:30

कोरोना आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, बेडसाठी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची भटकंती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी संजय ...

Jumbo OPD serves more than a thousand corona sufferers | जम्बो ओपीडीत हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधितांना रुग्णसेवा

जम्बो ओपीडीत हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधितांना रुग्णसेवा

Next

कोरोना आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, बेडसाठी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची भटकंती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव आणि भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. पल्लवी सापळे यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णसेवेसाठी जम्बो ओपीडीची संकल्पना जिल्हा टास्क फोर्स कोविड १९ च्या माध्यमातून मांडली. ३० मार्च रोजी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली कोरोना रुग्णांसाठी २४ तास जम्बो ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला.

यानुसार रुग्ण सर्वप्रथम जम्बो ओपीडीमध्ये येतील. १ एप्रिलपासून जम्बो ओपीडी सुरू करण्यात आली. जम्बो ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर रुग्णाच्या आरोग्य स्थितीनुसार त्या रुग्णास कोणत्या सरकारी रुग्णालयात दाखल करावे यासाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याकरिता शहरातील डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन तेथे दाखल असलेल्या रुग्णांचे नियोजन करून वेळप्रसंगी दूरध्वनीवरून माहिती संकलित करून जम्बो ओपीडीमधील रुग्णास तातडीने त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही डाॅ. अमिता रानडे, सहयोगी प्राध्यापक डाॅ. सारिका पाटील यांनी उत्कृष्टपणे हाताळली आहे. डाॅ. अमिता रानडे यांनी सांगितले की, जम्बो ओपीडी कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी या ओपीडीला वेळोवेळी सर्वतोपरी मदत केली. अनेकदा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. महानगरपालिका आयुक्त अजीज शेख आणि उपायुक्त गणेश गिरी यांनी मनुष्यबळ व खाटांची व्यवस्था केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डाॅ. अरुण मोरे यांनी यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Jumbo OPD serves more than a thousand corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.