पाण्यासाठी जुगाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:33 IST2021-04-26T04:33:07+5:302021-04-26T04:33:07+5:30
पुलाचे कठडे बसवा धुळे : चिमठाणे ते दोंडाईचा रस्त्यावरील नाल्यावरील पुलाचे कठडे तुटले आहे. याशिवाय रस्त्याचीही दुरवस्था ...

पाण्यासाठी जुगाड
पुलाचे कठडे बसवा
धुळे : चिमठाणे ते दोंडाईचा रस्त्यावरील नाल्यावरील पुलाचे कठडे तुटले आहे. याशिवाय रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मास्क बंधनकारकच
धुळे : शहरात अनेक व्यावसायिक रस्त्यालगत हातगाड्या लावून किरकोळ व्यवसाय करीत असतात. मात्र, यातील बहुतांश विक्रेते हे मास्क लावतच नसल्याचे दिसून येते. त्यांना मास्क बंधनकारक करण्यात यावा, अशी मागणी आहे.
रस्त्याची दैना
धुळे : शहरातून जाणाऱ्या नागपूर-सुरत महामार्ग चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने चितोड चौफुलीपासून जवाहर सूतगिरणी पर्यंतच्या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघात होऊ शकतात.
पाणी गळती
धुळे : येथील सुशिनाल्यात पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. पाईप फुटल्याने त्यात नाल्याचे दूषित पाणी जाऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.