मालपूरला समर्थकांचा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 22:47 IST2020-01-10T22:46:51+5:302020-01-10T22:47:24+5:30
दोन्ही गणात भाजपच्या उमेदवाराने विजय

Dhule
मालपूर :मालपूर गटात व गणात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. यात गटात कॉँग्रेसचा तर उर्वरित दोन्ही गणात भाजपच्या उमेदवाराने विजय मिळविला.
मालपूर जिल्हा परिषद गटात कॉँग्रेसच्या चंद्रकला हेमराज पाटील यांनी बाजी मारली. तर प्रतिस्पर्धी भाजपच्या सुजाता सतिष पाटील यांचा पराभव झाला.
निमगुळ गणात भागाबाई चंद्रसिंग भिल हेच सरस ठरले. मात्र मालपूर गणात जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती पुषा नरेंद्रसिंह रावल या भाजपतर्फे विजयी झाल्या. त्यांना सुराय येथील कल्पना पाटील यांनी चांगली लढत दिली. चंद्रकला पाटील विजयी झाल्यानतंर गावात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समर्थकांनी हेमराज पाटील यांना खांद्यावर उचलून जल्लोष करण्यात आला.दरम्यान मालपूर गटात सुरवातीपासूनच अत्यंत चुरस निर्माण झालेली होती. मात्र खेळीमेळीच्या वातावरणात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पार पडल्याने मालपूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.