भाजयुमोच्या पिंपळनेर व साक्री मंडळाची संयुक्त बैठक - संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:23+5:302021-02-18T05:07:23+5:30
बैठकीला भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैंद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मैंद यांनी आत्मनिर्भर भारत व युवा वॉरियर्स या ...

भाजयुमोच्या पिंपळनेर व साक्री मंडळाची संयुक्त बैठक - संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन
बैठकीला भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैंद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मैंद यांनी आत्मनिर्भर भारत व युवा वॉरियर्स या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच धुळे (ग्रामीण) भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील यांनी संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धुळे मंडळ अध्यक्ष गौरव पाटील, मोतीलाल पोतदार, चंद्रशेखर बाविस्कर, प्रमोद गांगुर्डे, रामकृष्ण एखंडे, नितीन कोतकर, कल्पेश नेरकर, चेतन पगारे उपस्थित होते.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संभाजीराव पगारे यांची महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथ निवड समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपळनेर मंडळ अध्यक्ष पंकज भावसार, साक्री मंडळ अध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी श्रीकांत पगारे, रामकृष्ण सोनवणे, संदीप घाणेकर, अतुल खैरनार, सचिन नांद्रे, किशोर चौधरी, दीपक पाटील, रवी सोनवणे, चेतन बिरारीस, योगेश भामरे, प्रशांत जगताप, भटू निकुंभ, नयन सूर्यवंशी, शिवाजी राऊत, भूषण भदाणे, चिराग क्षीरसागर, मयूर जाधव, सौरभ कोठावदे, समर्थ पगारे, आदींनी परिश्रम घेतले.