दागिने, पैशांनी भरलेले पाकिट तत्परतेने दिले महिलेला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:51 IST2019-11-06T22:50:41+5:302019-11-06T22:51:14+5:30
ॅपिंपळनेर : प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या चालक, वाहकांचे कौतुक

dhule
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील सामोडे येथील महिलेची एस.टी. बसमध्ये नजरचुकीने राहून गेलेले पाकिट चालक व वाहक यांनी परत दिले. त्यात दागिने, पैसे व आधार कार्ड होते. त्यामुळे चालक-वाहकांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
साक्री तालुक्यातील सामोडे येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज शिंदे यांच्या पत्नी पुष्पा शिंदे या दिवाळीनिमित्त माहेरी गेल्या होत्या. त्या सोमवारी ४ रोजी घरी परत येण्यासाठी सटाणा येथून पुणे-साक्री या एसटी बसमध्ये बसल्या. त्यांनी सामोडे गावाचे तिकीट काढले. सामोडे गावात उतरण्यसाठी त्या मागील बाकावरून पुढे आल्या. आणि गाव पुढे असल्याने त्या वाहकाच्या सिट वर बसल्या होत्या. वाहक तिकीट बुकिंगसाठी मागे गेले असता त्यांना सीटवर पाकिट पडलेले दिसले. त्यांनी ते पाकीट उघडून पाहिले असता त्यात सोन्याचे दागिने, पैसे व आधार कार्ड होते. त्यांनी सामोडे स्थानकावर गाडी थांबवून कुणाचे पाकिट हरवले आहे का असा आवाज दिला. आधार कार्डवर असलेले नावही वाचून दाखविले. ते पाकीट सामोडे येथील पुष्पा पंकज शिंदे यांचे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना वाहक प्रशांत पाटील व चालक सुनील भामरे ेयांनी ते परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सामोडे गावासह तालुक्यात कौतुक होत आहे.
आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याने गावातील पंकज शिंदे, दिलीप घरटे, विलास घरटे, दिनेश भदाणे, दिपक भारूडे, अनिल शिंदे, आप्पा शिंदे, रावसाहेब घरटे, मुकुंद घरटे, राजेंद्र शिंदे, डॉ.नरेंद्र भदाणे आदींनी पाटील व भामरे यांचे कौतुक व अभिनंदन केले.