जयकुमार रावल, कुणाल पाटील, मंजुळा गावित, काशिराम पावरा विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:22 IST2019-10-24T14:22:29+5:302019-10-24T14:22:53+5:30
विधानसभा निवडणूक : धुळे शहराबाबतची घोषणा बाकी, एमआयएम आघाडीवर

जयकुमार रावल, कुणाल पाटील, मंजुळा गावित, काशिराम पावरा विजयी
धुळे : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास पुर्णत्वास आलेली होती़ जिल्ह्यातील पाचही मतदार संघापैकी केवळ धुळे शहराची अंतिम घोषणा बाकी आहे़ त्यात एमआयएमचे फारुक शहा यांनी आघाडी घेतल्याचे वृत्त आहे़ तसेच विजयी झालेल्यांमध्ये शिंदखेडा मतदार संघातून विद्यमान मंत्री जयकुमार रावल, धुळे ग्रामीण मतदार संघातून विद्यमान काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, साक्री मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करणाºया मंजुळा गावित, शिरपूरमध्ये विद्यमान आमदार काशिराम पावरा यांना विजयी घोषीत करण्यात आले़ त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला़