जवाहर फाऊंडेशनच्या कोविड सेंटरमध्ये ३०० रुग्णांवर उपचार२२० खाटांचा कक्ष : आरटीपीसीआर चाचणीचीही सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:47+5:302021-03-25T04:34:47+5:30
या हाॅस्पिटलमध्ये १५ ऑगस्टपासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या तीस वर्षापासून रुग्णसेवा करणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये कोविड काळात ...

जवाहर फाऊंडेशनच्या कोविड सेंटरमध्ये ३०० रुग्णांवर उपचार२२० खाटांचा कक्ष : आरटीपीसीआर चाचणीचीही सुविधा
या हाॅस्पिटलमध्ये १५ ऑगस्टपासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या तीस वर्षापासून रुग्णसेवा करणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये कोविड काळात १२० बेडेड डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. या सेंटरमध्ये ३०० हून अधिक रुग्णांवर यशस्वीपणे उपचार झाले. आता कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सर्व सुविधांनी सुसज्ज असे आॅक्सिजनयुक्त २२० बेडेड कोविड हेल्थ केअर सेंटर पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. ज्यात कोविड, कोविड अतिदक्षता, नॉन कोविड अतिदक्षता इत्यादी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहेत. तसेच कोविडसाठी अत्यावश्यक असणारी आरटीपीसीआर तपासणी देखील करण्यात येते. चोविस तासात अहवाल प्राप्त होतो.
शासनाने निर्देशित केलेल्या सुचनेनुसार हॉस्पिटलमध्ये कोविड लसीकरण सुविधा देखील उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ ४५ ते ६० वर्षे वयोगटातील जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. सदर लसीकरण सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत तर शनिवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत करण्यात येत आहे. लसीकरणासाठी केंद्रसरकारच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अडथळा आल्यास लसीकरणस्थळी नोंदणी करता येणार आहे. तरी सदर सेवांचा कोविडग्रस्त रुग्णांनी व कोविड लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील, सहसचिव संगिता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर पवार आदींनी केले आहे.