जानेवारीत ३७३ जणांना कोरोनाचा संसर्ग, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST2021-02-05T08:43:49+5:302021-02-05T08:43:49+5:30

धुळे - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३७३ ...

In January, 373 people were infected with the corona and three died | जानेवारीत ३७३ जणांना कोरोनाचा संसर्ग, तिघांचा मृत्यू

जानेवारीत ३७३ जणांना कोरोनाचा संसर्ग, तिघांचा मृत्यू

धुळे - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३७३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ४०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना या महिन्यात मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी रुग्णांचे आढळणे सुरूच आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या १२९ रुग्णांवर उपचार सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८०९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४ हजार २०९ जण बरे झाले आहेत तर ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील सर्वाधिक १७३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच धुळे तालुक्यातील ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून धुळे तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. तालुक्याचा ४ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्युदर आहे. शिरपूर तालुक्यातील ६७, शिंदखेडा ४५ व साक्री तालुक्यातील ३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१२९ रुग्णांवर उपचार - १२९ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यात धुळे शहरातील ९३ रुग्णांचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील २५ कोरोना बाधित रुग्ण आहेत. साक्री तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आहे. शिरपूर तालुक्यात ४ तर शिंदखेडा तालुक्यात ६ बाधित रुग्ण आहेत. साक्री व शिरपूर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापूर्वीही कमी झाली होती. मात्र त्याठिकाणी पुन्हा रुग्ण आढळले होते.

६९ रुग्णांना लक्षणे नाहीत -

सध्या उपचार घेत असलेल्या १२९ पैकी ६९ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. २९ रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. २३ रुग्णांना मध्यम तर ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयात १९ व इतर जिल्ह्यात ५ जण उपचार घेत आहेत. तर ९० जण गृह विलगीकरणात आहेत.

Web Title: In January, 373 people were infected with the corona and three died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.