दोंडाईच्यात ‘जनता कर्फ्यू’ला मिळाला उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:27 IST2020-07-19T22:26:52+5:302020-07-19T22:27:46+5:30
पहिला दिवस । पाच दिवस नागरिकांनी अशापद्धतीने सहकार्य करावे, प्रशासनाचे आवाहन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जबाबदार नागरिकांचा मागणीनुसार शनिवारपासून शहरात सुरू झालेल्या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शनिवार ते बुधवार असा पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’ राहणार आहे.
दोंडाईचा व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. ^^कोरोना बाधित रुग्ण वाढू नयेत म्हणून कोरोना साखळी तुटणे आवश्यक आहे. कोरोना साखळी खंडित होण्यासाठी जागरूक नागरिकांनी दोडाईच्यात जनता कर्फ्यूची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारपासून पाच दिवशीय जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. शनिवार ते बुधवार दरम्यान पाच दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.
जनता कर्फ्यूत कृषी केंद्र, मेडिकल, हॉस्पिटल व बँक सुरू आहेत. किराणा, भाजीपाला, सोने चांदी, कापड दुकाने बंद आहेत. त्यामुळे दोंडाईचा शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य दिसलेत. स्टेशन भाग, बस स्थानक परिसर, भाजीपाला मार्केट, मुख्य बाजारपेठ किराणा परिसर, बँक परिसर या ठिकाणासह अन्यत्र गर्दी दिसली नाही. ग्रामीण भागातील जनता दोंडाईचात आली नाही. बँक सुरू असूनही बँकेत मोजकेच ग्राहक आलेत .कृषी केंद्रावरही सामसूम दिसली. मेडिकल वर एखादं दोन पेशंट-ग्राहक दिसलेत. एकंदरीत दररोज तोबा गर्दी असणाऱ्या दोंडाईचा शहरात गर्दी दिसली नाही. शहरातील बस स्थानक व रेल्वे स्थानक येथेही सामसूम दिसली.
तरीही कोरोना साखळी खंडित होण्यासाठी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना मास्क न वापरणाºया आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणाºया लोकांवर अजुनही सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे.
शहरात विनाकारण मोटर सायकलवर सुसाट वेगाने फिरणाºया तरुणांवरही कारवाई झाली पाहीजे. अशी कारवाई केली तरच कोरोना आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.