जमीअत उलमाचाही चिनी मालावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:38 IST2020-06-20T20:37:49+5:302020-06-20T20:38:08+5:30
धुळे : येथील जमीअत उलमा संघटनेने देखील चिनी मालाच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला असून नागरिकांनीही चिनी वस्तुंची खरेदी बंद ...

dhule
धुळे : येथील जमीअत उलमा संघटनेने देखील चिनी मालाच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला असून नागरिकांनीही चिनी वस्तुंची खरेदी बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे़ जमीअत उलमाचे जिल्हाध्यक्ष हाफिज हिफजुर रहेमान, शहर अध्यद्व मौलाना जियाउर रहेमान, उपाध्यक्ष मौलाना शकील कासमी, सचिव मुश्ताक सुफी, मौलाना आबिद कासमी, मुफती शफीक कासमी, महमंद युसूफ, माजी महापौर शव्वाल अन्सारी, परवेज अहमद, मुख्तार शरीफ, महमंद आरीफ, एजाज अहमद यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून चीनच्या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे़ तसेच शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे़ ‘ईट का जवाब पत्थर से’ देण्याची गरज आहे, शहीद जवानांच्या कुटूंबांना आर्थिक मदतीसह कुटूंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे़ मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्या़