साक्री मंडल भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी जैताणेच्या दीपाली जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:24+5:302021-02-05T08:44:24+5:30

भाजप महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा प्रा.सविता पगारे व साक्री मंडलाध्यक्ष वेडू सोनवणे यांनी ही नियुक्ती केली. दोंडाईचा येथील रावल ...

Jaitane's Deepali Jagdale as Sakri Mandal BJP Mahila Morcha President | साक्री मंडल भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी जैताणेच्या दीपाली जगदाळे

साक्री मंडल भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी जैताणेच्या दीपाली जगदाळे

भाजप महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा प्रा.सविता पगारे व साक्री मंडलाध्यक्ष वेडू सोनवणे यांनी ही नियुक्ती केली. दोंडाईचा येथील रावल गढीवर दि २० रोजी दुपारी झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत नाशिकच्या खासदार डॉ.भारती पवार व माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते जगदाळे यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले.

भाजपचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवी अनासपुरे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, विद्यमान ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, प्रमोद गांगुर्डे, अरुण धोबी, जिल्हा सरचिटणीस डी.एस. गिरासे, शैलेंद्र आजगे, लीला सूर्यवंशी, चंद्रकला सिसोदिया, पिंपळनेरचे मंडलाध्यक्ष इंजि. मोहन सूर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजितचंद्र शहा, दशरथ शेलार, विलास मोरे, धर्मराज सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

फोटोतील मजकूर

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) : दीपाली जगदाळे यांना भाजप महिला मोर्चाच्या साक्री मंडलाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देताना खासदार डॉ. भारती पवार, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल. शेजारी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रा.सविता पगारे, बबनराव चौधरी, इंजि. मोहन सूर्यवंशी आदी.

Attachments area

Web Title: Jaitane's Deepali Jagdale as Sakri Mandal BJP Mahila Morcha President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.