जयहिंदचे माजी चेअरमन आय.जी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:49 IST2019-04-19T22:48:56+5:302019-04-19T22:49:43+5:30

आज अंत्ययात्रा : धुळ्यातील ख्यातनाम वकील

Jaihind's former chairman IG Patil dies | जयहिंदचे माजी चेअरमन आय.जी. पाटील यांचे निधन

dhule

धुळे : शहरातील सहकार क्षेत्रातील ख्यातनाम वकील आणि जयहिंद शैक्षणिक संस्थेचे माजी चेअरमन जिल्हा बार कौन्सील व गोबा बार कौन्सीलचे माजी उपाध्यक्ष आय.जी.पाटील (वय ७६ वर्ष) यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दीर्घआजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या जयहिंद कॉलनीतील राहत्या घरापासून निघणार आहे.
अ‍ॅड. आय.जी. पाटील हे मुळचे टेंभा ता.शहादा जि.नंदुरबार येथील राहणारे होते. वकील व्यवसायाच्या निमित्ताने धुळ्यात स्थायिक झाले. ते सहकार क्षेत्रातील ख्यातनाम जुने वकील होते.
त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील जेष्ठ नेत्यांशी संबंध होते. त्यांनी धुळे पिपल्स को.आॅप.बँकेचे चेअरमनपद सांभाळले. तसेच जयहिंद शैक्षणिक संस्थेचे ते सात वर्ष चेअरमन होते. याशिवाय त्यांनी शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थेत विविध पदावर काम केले होते. त्यांना काही वर्षापूर्वी अर्धांग वायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली होते. दीर्घ आजारानंतर त्यांचे शुक्रवारी धुळ्यात निधन झाले.
पश्चात अ‍ॅड.जितेंद्र, चंद्रशेखर आणि अ‍ॅड.अभिजीत अशी तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Jaihind's former chairman IG Patil dies

टॅग्स :Dhuleधुळे