शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 11:53 IST

निकालाबाबत प्रयत्न करण्याचे प्रशासनातर्फे आश्वासन

आॅनलाइन लोकमतधुळे :पेपरमध्ये नापास केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे या मागणीसाठी धुळे येथील शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करून कॉलेज काहीवेळ बंद केले होते. दरम्यान त्यांना तेथुन हुसकवण्यात आल्यानंतर अभाविपच्या नेतृत्वाखाली १२ जणांनी बुधवारी क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान सायंकाळी आयटीआय प्रशासनाकडून निकालाबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.‘आॅपरेटर अ‍ॅडव्हॉन्स मशीन टुल्स’ या विषयाचा थेअरी पेपर सप्टेंबर महिन्यात झाला. या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. त्यात थेअरी पेपर १ मध्ये सर्वच विद्यार्थी नापास झाले. या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे कैफियत मांडली. प्राचार्यांनी आयटीआयची परीक्षा घेणाºया यंत्रणेशी संपर्क साधला. तांत्रिक बाजूची पडताळणी केली. यावर विद्यार्थ्यांनी मुंबई येथील संचालक कार्यालयात निवेदन दिले. मात्र, यानंतरही अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचा निकालात कोणताच बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले होते. बुधवारीही सकाळी विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला. दरम्यान आंदोलनाची दखल घेत पोलीस त्याठिकाणी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.मात्र जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा तपासण्यात याव्यात, त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अभाविपच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारपासून क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषणास सुरूवात केली होती. विजय परमार, आकाश थोरात, निलेश अहिरे, जयेश पाटील, योगेश देवरे, उमेश देवरे, दिनेश पाटील, गंगाधर कोलमवार, अजय वाघ, निलेश हिळे हे ्रआमरण उपोषणास बसल्याची माहिती गंगाधर कोलमवार यांनी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनीघेतला आढावादरम्यान या आंदोलनाबाबत सायंकाळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आढावा घेतला. आयटीआयचे प्राचार्य एम.के.पाटील यांनी सविस्तर माहिती जिल्हाधिकाºयांना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरेही उपस्थित होते.सायंकाळी उपोषण मागेदरम्यान प्राचार्य पाटील यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच निकालासंदर्भात आयटीआय प्रशासन प्रयत्न करेल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे