हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बँक वसुलीवाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:33 IST2021-08-01T04:33:22+5:302021-08-01T04:33:22+5:30
बँकांच्या कर्जामध्ये सर्वाधिक कर्जदार गृहकर्जदार आहेत. त्यानंतर महिला बचत गट, दुचाकी, चारचाकी, शैक्षणिक, वयक्तिक कर्ज अशा कर्जाचा समावेश आहे. ...

हप्ता भरायला उशीर झाला; घरी येतोय बँक वसुलीवाला !
बँकांच्या कर्जामध्ये सर्वाधिक कर्जदार गृहकर्जदार आहेत. त्यानंतर महिला बचत गट, दुचाकी, चारचाकी, शैक्षणिक, वयक्तिक कर्ज अशा कर्जाचा समावेश आहे. सध्या दुसरी लाट ओसरली असली तरी व्यापारात मंदीचे सावट असल्याने अनेकांना कर्जाचे परतफेड करण्यासाठी अडचणीला सामना करावा लागत आहे.
कर्ज थकली, गृहकर्जाचे प्रमाण जास्त
शहरी व ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उभारणीसाठी विविध खासगी व सरकारी बँका, पथसंस्था व बचत गटांमार्फत कर्ज देण्यात आले आहेत. मात्र त्यांच्याकडून वारंवार हप्त्यासाठी तगादा लावला जात असल्याचे समजते.
एकूण कर्जामध्ये सर्वाधिक थकबाकीदार गृहकर्जाचे दिसून येतात.
दुकान बंद पडले, कर्ज कसे भरणार?
कोरोनाकाळापासून व्यवसाय अस्थिर झालेला आहे. त्यामुळे व्यवसाय करणेदेखील अवघड झालेला आहे. त्यामुळे दुकानांचा हप्ता, लाइट बिल, वाॅचमन पगार, कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागतो. त्यामुळे कर्ज फेडावे कसे, असा प्रश्न पडला आहे.
-विजय अग्रवाल, व्यावसायिक
लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून व्यवसाय करण्यासाठी नियम व अटी लागू केलेल्या आहेत. त्यामुळे कमी वेळेत व्यवसाय करणे शक्य होते नाही. बँकेच्या हप्ता थकल्यावर लगेच नोटीस येते. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
-संजय सोलंकी, व्यापारी