धुळे : पावसाळा लवकरच सुरु होणार असल्यामुळे नागरीकांची वस्तूंच्या खरेदीसाठी आता लगबग सुरु झाली आहे़ त्यासाठी प्लॅस्टिक खरेदी करण्यासाठी नागरीकांनी धुळ्यातील बाजारपेठेत गर्दी केलेली आहे़ सकाळच्या वेळेस त्याच्यात अधिकच भर पडत आहे़मे महिन्याची तिव्रता कमी होत नाही तोच जून महिन्यातील पावसाची चाहूल लागली आहे़ पावसाळा सुरु होण्यापुर्वीच आवश्यक ती खरेदी करण्यासाठी ग्रामीण जनतेसह शहरातील नागरीकांनी धुळ्यातील पाच कंदिल भागातील बाजारपेठेत गर्दी केली आहे़ त्यासाठी दुकानात लागलेली प्लॅस्टिक कागदाची खरेदी केली जात आहे़ यंदाच्या वर्षी त्यात वेगवेगळे रंग देखील विक्रीसाठी दाखल झाले आहेत़ प्लॅस्टिक कागदांमध्ये जाड आणि बारीक असे दोन्ही प्रकार असल्याने योग्य तो अंदाज घेऊन खरेदी केली जात आहे़ लॉकडाउनचा काळ असलातरी सकाळी सूट मिळताच गर्दी वाढत आहे़
पावसाळा सुरु होताच लगबग झाली सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:15 IST