गळती दुरूस्तीसाठी चांगले रस्ते तोडण्याची नामुष्की येवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:00 PM2020-11-17T22:00:34+5:302020-11-17T22:01:18+5:30

येथील मार्केट यार्ड परिसरातील प्रभाग क्रमांक अकरा

It should not be a disgrace to break good roads to repair leaks | गळती दुरूस्तीसाठी चांगले रस्ते तोडण्याची नामुष्की येवू नये

dhule

Next


धुुळे : येथील मार्केट यार्ड परिसरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील ऐंशी फुटी रोडवरील नटराज टॉकीज पासून ते वाखारनगर तेथुन गुरू राजेंद्र सुरी नगरापर्यंत महानगरपालिकेअंतर्गत भुयारी गटार व रस्त्याचे काम सुरू आहे. या या परिसरात अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. गळती काढण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. तात्पुता दुरूस्ती झाल्याने सांडपाणी खड्यातसाचून नागरिकांना पुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील नागिरकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
याठिकाणी जलवाहिनीला एकाच ठिकाणी ५ फुटांच्या अंतरात ५ ते ६ ठिकाणी गळती लागली आहे. गळती थांबविण्यासाठी ५ फुटांचा पाईप जोडणं गरजेचे असतांना तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
सदर प्रकार परिसरातील नागरिकांनी प्रभागाच्या नगरसेवकांकडे तक्रार केली. मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.
या खड्ड्यात सिमेंट टाकून थातुरमातुर काम केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा जलवाहिनीला गळती लागुन चांगले रस्ते फोडण्याची नामुष्की ओढवली जाते. तात्पुरत्या स्वरूपाचे काम न करता भरीव व टिकाऊ काम करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: It should not be a disgrace to break good roads to repair leaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे