दिलेली जबाबदारी चोख बजावणे हे कर्तव्यच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:46 IST2019-11-15T11:45:18+5:302019-11-15T11:46:00+5:30
न्या.एस.एल. वैद्य : शिंदखेडा येथे आयोजित कायदेविषयक शिबिरप्रसंगी प्रतिपादन

Dhule
शिंदखेडा : अधिकारी, कर्मचारी यांना दिलेली जबाबदारी त्यांनी चोख बजावणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. जर आपण जबाबदारीने काम केले तर न्यायालयावरील भार कमी होईल, असे मत येथील न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. वैद्य यांनी गुरूवारी येथील तहसील कार्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरप्रसंगी व्यक्त केले.
त्यांच्या अध्यक्षतेत हे शिबिर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव सोनवणे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.एम.बी. मराठे, सचिव अॅड.हर्षल अहिरराव, बी. व्ही. सोनवणे, बी.झेड. मराठे, व्ही.एल. पाटील, पी. सी. जाधव, व्ही.एस. वाघ, मिलिंद सोनवणे, शारदा मराठे, प्रतीक्षा मराठे, ज्योत्स्ना पारधी आदी उपस्थित होते.
तालुका विधी सेवा समितीमार्फत ९ ते २३ नोव्हेंबर या दरम्यान विधी सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गुरूवारी दुपारी २ वाजता विधी सेवा समिती व येथील तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सभागृहात कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.
न्या.वैद्य पुढे म्हणाले की आपापली कामे जबाबदारीने पूर्ण केले तर कोणत्याच नागरिकाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्याची गरज पडणार नाही. पर्यायाने न्यायालयांवरील भार या मुळे कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर बाबी समजण्यासाठी हे कायदेविषयक शिबीर आयोजित केले आहे. त्याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. अॅड.व्ही.एस. वाघ यांनी जमीन महसूल कायदा १९६६ या विषयावर तर अॅड.वसंत पाटील यांनी भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन केले,
कार्यक्रम यशस्वी त्यासाठी न्यायालयीन सहाययक अधीक्षक एस.पी. खर्चे, कनिष्ठ लिपिक नंदकिशोर मिस्तरी, अजय मेटकर, रणजित चौधरी, लक्ष्मण चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.एच.बी. अहिरराव यांनी केले तर आभार अॅड. बुधा सोनवणे यांनी मानले.
या शिबिरासाठी शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले.