एसआरबी शाळेला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:01 IST2018-12-08T18:00:59+5:302018-12-08T18:01:26+5:30
दहिवद येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूल

एसआरबी शाळेला आयएसओ मानांकन
शिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूलने आय.एस.ओ. ९००१:२०१५ नामांकन प्राप्त केले़ त्या संदर्भातले प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी पी़झेड़रणदिवे यांनी संस्थेचे चेअरमन डॉ़धीरज बाविस्कर यांना दिले़
आय.एस.ओ. म्हणजेच इंटरनॅशनल आॅरगनाझेशन फॉर स्टँडर्डडायझेशन आहे. मॅनेजमेंट सिस्टिम सर्टिफिकेशन, मेंबर आॅफ मल्टीलेटरल रेकगनायझेशन अरेंजमेंट, दुबई एक्रीडीएशन सेंटर यांच्या द्वारे हे मानांकन प्रमाणित करण्यात आले आहे. हे मानांकन पुढील तीन वर्षाकरीता प्रमाणित आहे. गुणवत्ता हे जिचे ध्येय आहे अशा ह्या संघटनाद्वारे एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कुलला सन्मानित करण्यात आले. वेळेनुसार विद्यालयीन परिवर्तन, आवश्यक व सुधारित कार्यवाही, व्यक्तिगत विकास, उत्कृष्ट कार्यप्रणाली अशा अनेक अटींची पुर्तता करत एस.आर.बी.ने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा हा स्तर सुध्दा पार केला आहे.
हे मानांकन गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे यांच्या हस्ते विद्यालयाचे चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर यांना देण्यात आला़ यावेळी धुळ्याच्या विद्याताई पाटील, पुरुषोत्तम बागुल, समन्वयक व्ही.एस. पाटील, प्राचार्या शक्तीदेवी माने, प्रशासकीय अधिकारी श्रीराम कुर्हेकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.