विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 21:53 IST2021-03-11T21:53:18+5:302021-03-11T21:53:26+5:30
मेहेरगाव येथील शेतातील घटना

विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
धुळे : तालुक्यातील बांभुर्ले येथील इसमाचा मेहेरगाव येथील एका शेताच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी उजेडात आली़ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़
तालुक्यातील मेहेरगाव येथील शेतातील विहिरीत आधार किशन पाटील (५०, रा़ बांभुर्ले ता़ धुळे) हे सिव्हील हॉस्पिटल येथे शिपाई पदावर कार्यरत आहेत़ आधार पाटील यांनी मेहेरगाव येथील देवेंद्र भामरे यांचे शेत निमबटाईवर घेतले होते़ या शेतात ते बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाणी भरण्यासाठी गेले होते़ गुरुवारी दुपारपर्यंत ते घरी आलेले नव्हते़ त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात तपास करण्यात आला़ विहिरीजवळ पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़ त्यांना विहिरीच्या बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़