पाटचारीचे पाणी अखेर पोहोचले शेतांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:30 IST2020-03-09T12:29:50+5:302020-03-09T12:30:18+5:30
कनोली प्रकल्प : रब्बी पिकांना मिळणार जीवदान, शेकडो शेतकऱ्यांना दिलासा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील कनोली मध्यम प्रकल्पाच्या पाटचारी क्रमांक तीनचे पाणी अखेर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यामुळे विंचूर, तरवाडे, नाणे, सिताणे येथील शेकडो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ १५ तारखेपर्यंत पाटचारी तीनचे पाणी सुरू राहणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी अधिकृतरित्या मागणी नोंदवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे़
गेल्या आठवड्यात कनोली प्रकल्पाच्या पाण्याचा वाद चिघळला होता़ ४६ वर्षांपूर्वी आकारास आलेल्या या कनोली प्रकल्पातील पाणी पाटचाºयांमध्ये सोडण्यासाठी मोठी तांत्रिक अडचण आहे़ एका पाटचारीत पाणी सोडण्यासाठी दुसरी पाटचारी बंद करावी लागते़ पाटचारी तीनमध्ये पाणी सोडण्यासाठी पाटचारी एकचे पाणी बंद करावे लागते़ परंतु पाणी बंद करण्यासा पाटचारी एकवरील बोरकुंड आणि नंदाळे येथील शेतकºयांनी विरोध केला होता़ प्रसंगी पाटचारीवरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ दुसरीकडे पाण्याअभावी पिके करपू लागल्याने पाटचारी तीनवरील शेतकºयांनी देखील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आक्रमक आंदोलन करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता़ या संपूर्ण प्रकरणात धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची गोची झाली होती़ यावर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पोलिस बंदोबस्तात सहा तारखेला पाटचारी एकचे पाणी बंद करुन पाटचारी तीनमध्ये पाणी सोडले़ त्यामुळे येथील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़
शुक्रवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाटचारी एक बंद करण्यासाठी गेले त्यावेळी काही शेतकºयांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला़ परंतु पोलिस कर्मचाºयांनी खाक्या दाखवताच त्यांनी माघार घेतली़ पाटचारी एक बंद करण्याची आणि पाटचारी तीनमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली़
दरम्यान, पाटचारी एक आणि दोनच्या शेतकºयांनी परस्पर गेट उघडून पाणी चोरण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे़
अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी स्थानिक शेतकºयांची पाणीवापर संस्था सुरू झाली पाहिजे़ परंतु गेल्या चार वर्षांपासून पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पात ठणठणाट होता़ त्यामुळे संस्था स्थापण्याचा उत्सुकता नाही़