तिसगाव ढंढाने (ता़ धुळे) : येथील भात नदीवर असलेला बंधारा गेल्या दोन-तीन वर्षांपासून फुटलेला आहे. बंधाºयाच्या दुरूस्तीकडे लघुसिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले असून, दरवर्षी लाखो लिटर्स पाण्याची नासाडी होत आहे. हा बंधारा दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे.येथे जलयुक्त शिवार अभियान योजना राबविण्यात आली. त्यावर्षी या धरणाचं काम देखील मंजूर झाले होते. परंतु लघुसिंचन विभागाने त्याजागी कामच केले नाही. येथील भात नदीवर बांधण्यात आलेल्या बंधारा फुटला असून, त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. या बंधाºयात पाणी साठल्यास परिसरातील शेती ओलीताखाली येऊ शकेल. तसेच तिसगावचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकणार आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यासही संबंधित विभागाला वेळ नाही. लघुसिंचनचे अधिकारी येतात, बंधाºयाची पहाणी करून जातात मात्र त्याची दुरूस्ती काही होत नाही. दरवर्षी लाखो लीटर्स पाणी वाया जात असते. आताही पावसाळा सुरू झालेला असून बंधाºयातील पाणी यावर्षीही वाहून जाईल असेच चिन्ह आहे.दरम्यान तीन वर्षांपूर्वी मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांचे मी स्वागत केले होते. मात्र नंतर काय झाले ते समजू शकले नाही. या बांधची दुरूस्ती झाल्यास परिसरातील शेती ओलिताखाली येईल असे तिसगाव येथील नामदेव भील या शेतकºयाने सांगितले.
धुळे तालुक्यातील तिसगाव भागातील बंधारा दुरूस्तीकडे लघुसिंचनचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:34 IST