परदेशाहून परतलेल्या सात जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:20 IST2020-03-21T13:17:16+5:302020-03-21T13:20:02+5:30

ज्येष्ट दाम्पत्य : लंडन दुबईचा समावेश

Investigation of seven persons returning from overseas | परदेशाहून परतलेल्या सात जणांची तपासणी

dhulle


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी सात रुग्णांची तपासणी करण्यात आली. सर्व रुग्ण परदेशातून शहरात परतले आहेत. यात वयोवृद्ध दाम्पत्याचा समावेश आहे. तपासणी झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे घशाचे द्राव तपासणीसाठी विषाणू संस्थेत पाठविण्यात आले आहेत तर सहा रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तपासणी झालेल्या व्यतींपैकी ३ व्यक्तींचा लंडन प्रवास झाला आहे तर चार व्यक्ती दुबई येथून प्रवास करून आले आहेत. दुबई वरून परतलेल्या वयोवृद्ध दाम्पत्याची तपासणी करण्यात आली ८० वर्षीय पती ला होम क्वारंटाईन करण्यात आले तर ७६ वर्षीय पत्नीचे घशाचे द्राव घेऊन तपासणीसाठी पुणे येथील विषाणू संस्थेत पाठविण्यात आले असून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात त्यांना दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी एकूण सात रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन चा सल्ला देण्यात आल्याची माहिती हिरे महाविद्यालयाचे वैधकीय अधीक्षक राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
चार रुग्णांचे नमुने प्राप्त- या आधी सहा रुग्णांचे नमुने तपासणीसाठी विषाणू संस्थेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४ रुग्णांचे नमुने प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा - गुरुवारी तपासणी झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे तर शुक्रवारी तपासणी झालेल्या एका व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही ते अहवाल प्राप्त झाल्यांनतर समजणार आहे.
येथील हिरे महाविद्यालयात आतापर्यंत २७ कोरोना संशयित रुग्णांची तपासणी झाली आहे. त्यापैकी ८ रुग्णांचे नमुने घेण्यात आले. पाच रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत तर ३ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. विलगीकरण कक्षात सध्या एक रुग्ण उपचार घेत आहे.

Web Title: Investigation of seven persons returning from overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे