४७५ उपवर-वधूंनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:37 IST2020-02-24T12:36:52+5:302020-02-24T12:37:44+5:30
सामुदायिक उपक्रम : मराठा, पाटील समाजाचा राज्यस्तरीय मेळावा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मराठा, पाटील समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात ४७५ उपवर-वधूंनी आपला संपूर्ण परिचय करुन दिला़ या मेळाव्यासाठी ७०० वधू-वरांच्या नावांच्या सुचीचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले़
अध्यक्षस्थानी अॅड़ एम़ एस़ पाटील होते़ तर महापौर चंद्रकांत सोनार, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, डॉ़ अरुण साळुंखे, डॉ़ दिलीप पाटील, अॅड़ जे़ टी़ देसले, सुरेंद्र मराठे, प्राचार्य व्ही़ के़ भदाणे, रणजितराजे भोसले, सुलभा कुवर, शिवाजी मराठे, शिवाजी पवार, बाळासाहेब शिंदे, अॅड़ श्यामकांत पाटील, प्रा़ डॉ़ नूतन पाटील, प्रा़ पी़ आऱ पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा नूतन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़
उपवर-वधूंचा परिचय मेळावा आणि सुची पुस्तिका आणि समाज उपयोगी काम केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे आयोजक संतोष सूर्यवंशी यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले़
उपस्थितांनी आपल्या मनोगतातून अनिष्ठ रुढी-परंपरा, साखरपुडा, हुंडा, गुण, मंगळ दोष, उंची, शिक्षण यासंदर्भात उपयुक्त असे प्रबोधन केले़ तर, शेतकरी, व्यावसायिकांना आपल्या मुली द्याव्यात़ तसेच घटस्फोटीत, विधवा यांना त्यांच्या पाल्यांसह स्विकारण्यात यावे असेही आवाहन आयोजकांकडून करण्यात आले़
परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी रंगराव पाटील, एस़ के़ पाटील, वाय़ के़ पाटील, सरोज बाविस्कर, सुमित पाटील, दिनेश सूर्यवंशी, एऩ आऱ पाटील, पी़ एस़ पाटील, सुभाष सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रा़ डॉ़ इंदिरा पाटील, सुनीता पाटील यांनी केले़ या मेळाव्यास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़