६५० युवक, युवतींनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:11 IST2020-02-10T23:11:32+5:302020-02-10T23:11:57+5:30

गवळी समाज : विरशैव लिंगायतच्या सर्व पोटजाती एकत्र

Introduction by 2 youths, youths | ६५० युवक, युवतींनी दिला परिचय

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाजाच्या पहिल्याच वधू-वर परिचय मेळाव्यात ६५० युवक आणि युवतींनी आपला परिचय करुन दिला़
विरशैव लिंगायत गवळी समाजाने पहिल्यांदाच वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले़ मेळावा यशस्वी करण्यासाठी धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या खेड्यापाड्यापर्यंत जनजागृती करुन उत्तर महाराष्ट्रात विखुरलेल्या सर्व पोटजातींना एकत्र आणण्याचे काम केले आहे, अशी माहिती मेळाव्याचे कार्याध्यक्ष राजेंद्र पंगुडवाले यांनी दिली़
शनिवारी कल्याण भवनात हा मेळावा झाला़ मेळाव्यासाठी विविध पोटजातीतील ६५० वधू-वरांनी नोंदणी केली होती़ या सर्वांनी आपला परिचय करुन दिला़ यावेळी किसन शिवाजी जोमिवाळे, राजेंद्र गठरी, शिवाजी बाचलकर, महादू उदिकर, शंकर लंगोटे, विठ्ठल उन्हाळे, अनिल जोमिवाळे, रमेश यमगवळी, रमेश दहिहांडे, संतोष अंजिखाने, अर्जुन यादबोले, राजेंद्र बिडकर, दिनेश अंजिखाने, बाळू घुगरे, शिवाजी यादबोले, तानाजी घुगरे, नंदु झिपरे, तानाजी बाचलकर, संजय घुगरे, प्रकाश यमगवळी, भटू घटी, साईनाथ अंजिखाने, नाना गोडळकर, सुरेश यादबोले, कृष्णा गढरी, किसन शहापूरकर, संजय बारसे, बाळू नागापुरे, काशिनाथ औशिकर, गोपाल लगडे, विजय यमगवळी, अर्जुन काटकर, मच्छिंद्र पिरनाईक, प्रकाश घुगरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Introduction by 2 youths, youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे