बाधित पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:16 IST2020-06-19T14:15:40+5:302020-06-19T14:16:08+5:30
शिरपूर : जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केले स्वागत, आतापर्यंत ५९ रूग्ण कोरोनामुक्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरात आतापर्यंत कोरोनाचे १२० रूग्ण आढळून आले आहेत़ त्यापैकी १५ जणांचा मृत्यु तर ५९ रूग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत़ दरम्यान, १७ रोजी देखील येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोनामुक्त पोलिस कर्मचाऱ्याचा डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या पोलीस कर्मचाºयाचे स्वागत जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी केले़
तालुक्यात आतापर्यंत १२० कोरोना बाधित झाले असून त्यात ग्रामीण भागातील १० तर उर्वरीत ११० शहरातील रूग्ण आहेत़ १६ रोजी देखील संध्याकाळी आलेल्या अहवालात येथील उपजिल्हा रूग्णालयात १५ पैकी ७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे़ त्यात आऱसी़ पटेल कॉलनीतील ४० वर्षीय पुरूष, कुंभारटेक येथील ५८ वर्षीय पुरूष, वरवाडे भागातील ६० वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय महिला, पाटीलवाड्यातील ४८ वर्षीय महिला तर करवंद येथील ११ वर्षीय मुलगा व १५ वर्षीय मुलगी असे ७ जण बाधित आढळून आले आहेत़ हे दोघे बालक गेल्या ४ दिवसापूर्वी करवंद येथील बाधित असलेले पती-पत्नी यांचे मुले आहेत़
कोरोनाने गेल्या आठवड्यापासून वरवाडे परिसरात शिरकाव केल्याने म्हळसामाता परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून दुकाने १७ व १८ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेवून या भागातून कोरोनाला हद्दपार करून प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे म्हाळसामाता परिसरातील दुकाने बंद ठेवली आहेत़
१७ रोजी येथील उपजिल्हा रूग्णालयातील २ कोरोना बाधित रूग्णांना डिस्चार्ज करून घरी सोडण्यात आले़ त्यात अंबिका नगरातील वृध्द पुरूष तर नाथनगरीतील रहिवाशी असलेला पोलिस दलातील कर्मचाºयाचा समावेश आहे़
यावेळी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़धु्रवराज वाघ, डॉक़पील पाटील, डॉ़मोहज्जीन खान, डॉ़योगेश अहिरे, डॉ़अमोल जैन, डॉ़महेंद्र साळुंखे, डॉ़शालीग्राम नेरकर, के़झेड़ पगार, सावता माळी, भगवान बोरसे, मसुदअली सैय्यद, बेबी गावीत, विजया शिरसाठ, खलाणे, खंडेराव ईशी, विनोद निकम, भूषण गवळी, कढरे यांच्यासह आरोग्य पथकाने टाळ्या वाजवून स्वागत केले़ दरम्यान, रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने दिलासा मिळाला आहे.