आंतरराष्ट्रीय परिषदेचे शनिवारी आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:25+5:302021-03-13T05:05:25+5:30
शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र आणि इंग्लिश लैंग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया खान्देश चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैयक्तिक आणि ...

आंतरराष्ट्रीय परिषदेचे शनिवारी आयोजन
शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र आणि इंग्लिश लैंग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया खान्देश चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य : वेद, योग, साहित्य, कायदा आणि विज्ञान यांची भूमिका’ या विषयावर या परिषदेत १३ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून झूमच्या माध्यमातून परिषद होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा. डॉ. जयदीप निकम यांच्या हस्ते या ई-परिषदेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्राचे अध्यक्ष किशोर पाटील राहतील. यात छत्तीसगढ येथील प्रा. डॉ. घनश्याम बीजभाषण करतील. थायलंड येथील प्रा. डॉ. धीरावित, नेपाळ येथील प्रा. डॉ. दुवाडी, जम्मू येथील प्रा. डॉ. अमिताभ, हरियाणाचे प्रा. डॉ. रवी शास्त्री हे रिसोर्स पर्सन म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी अडीच वाजता शोधनिबंध सादरीकरण झाल्यानंतर परिषदेचा समारोप होईल. परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ. गंगाधर बारचे, अध्यक्षस्थानी शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्राचे उपाध्यक्ष अरुण महाले भूषवतील. संशोधक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थिनी परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक जितेंद्र भामरे, समन्वयक प्रा. डॉ .वैभव सबनीस, प्रा. डॉ. संतोष पाटील, संयोजन सचिव यशवंत पाटील, अविनाश धर्माधिकारी, आदींनी केले आहे.