धुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पिकांना विम्याचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:46 IST2019-12-02T11:45:50+5:302019-12-02T11:46:08+5:30
ज्वारी, गहू, कांदा, उन्हाळी भुईमुगाचा केला समावेश

धुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पिकांना विम्याचे संरक्षण
आॅनलाइन लोकमत
धुळे :रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, कांदा व उन्हाळी भुईमुग या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणश्रया नुकसानीस वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट जसे नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणीपूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसुचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (सदरची पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे.) विमा संरक्षण देय आहे.
काढणी पश्चात नुकसान जसे चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकविण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तींतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्ती होणारी नुकसान भरपाई वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येतील.
योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी व महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाद्वारे देणे आवश्यक आहे.
शेतकºयांनी बँकेत विमा हप्ता व पेरणीची नोंद असलेला ७/१२च्या उताºयासह अर्ज आदी कागदपत्रे राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेत सादर केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागातील कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.