डाळिंब, लिंबू, मोसंबीला विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST2021-06-23T04:23:55+5:302021-06-23T04:23:55+5:30
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फळ पिकांचे प्रतिकूल हवामान घटकापासून उदा. कमी तापमान, वेगाचा वारा, अवेळी पाऊस यापासून ...

डाळिंब, लिंबू, मोसंबीला विमा कवच
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फळ पिकांचे प्रतिकूल हवामान घटकापासून उदा. कमी तापमान, वेगाचा वारा, अवेळी पाऊस यापासून नुकसान होऊन शेतकऱ्यांना
आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरुन निघावे म्हणून राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हवामान आधारित पथदर्शक फळ पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना २०२१ मध्ये मृग बहारामध्ये डाळिंब, लिंबू व मोसंबी या फळ पिकांकरिता लागू करण्यास शासनाने शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. अधिसूचित फळपिकापैकी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यास अर्ज करता येणार आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण कवच लागू राहणार आहे.
या योजनेत डाळिंब फळ पिकाकरिता १४ जुलै २०२१ पर्यंत मृग बहारासाठी अंतिम तारीख आहे. लिंबू, मोसंबी फळपिकाकरिता ३० जून २०२१ पर्यंत मृग बहारासाठी अंतिम तारीख आहे.
धुळे जिल्ह्यासाठी लागू केलेल्या फळ पिकांसाठी शेतकऱ्यांचा हिस्सा
डाळिंबासाठी सहा हजार ५०० रुपये तर लिंबूसाठी ३५०० रुपये व मोसंबी पिकासाठी ४ हजार प्रतिहेक्टर एवढा असेल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी म्हटले आहे.
या महसूल मंडळाचा करण्यात आला आहे समावेश
तालुक्यातील महसूल मंडळनिहाय अधिसूचित केलेले क्षेत्र असे (अनुक्रमे पीक, तालुका, अधिसूचित महसूल मंडळ याक्रमाने ) : डाळिंब : धुळे तालुका- धुळे(शहर), शिरूड, बोरकुंड,आर्वी, सोनगीर, नगाव बुद्रुक, फागणे, मुकटी, धुळे (ग्रामीण), कुसुंबा, नेर (म.), लामकानी. साक्री- साक्री,कासारे, म्हसदी (प्र.ने)., दुसाणे, निजामपूर, ब्राम्हणवेल, पिंपळनेर, दहिवेल, कुडाशी, उमरपाटा. शिंदखेडा- शिंदखेडा, चिमठाणे, शेवाडे, खलाणे, नरडाणे, बेटावद, वर्शी, दोंडाईचा, विखरण, विरदेल. शिरपूर -शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी.
लिंबू- धुळे (शहर), शिरुड, बोरकुंड, आर्वी, सोनगीर, नगाव बु., फागणे, मुकटी, कुसुंबा, नेर. लामकानी.
साक्री तालुका- साक्री, कासारे, म्हसदी प्र.नेर, दुसाणे, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, दहिवेल, कुडाशी, उमरपाटा.
शिंदखेडा तालुका-शिंदखेडा, चिमठाणे, शेवाडे, खलाणे, नरडाणे, बेटावद, वर्शी, दोंडाईचा, विखरण, विरदेल.
शिरपूर तालुका- शिरपूर, बोराडी, अर्थे, जवखेडे, होळनांथे, थाळनेर, सांगवी.
मोसंबी- शिरपूर तालुका- होळनांथे