जामचामळा पाण्याची टाकीची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:14 IST2019-11-06T23:13:46+5:302019-11-06T23:14:01+5:30

फारूख शहा : अधिकाऱ्यांना दिल्यात सुचना

Inspection of aquamarine water tank | जामचामळा पाण्याची टाकीची केली पाहणी

dhule


धुळे : शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिकेने १३६ कोटी योजेनेतून उभारण्यात आलेल्या जलकुंभाची मंगळवारी आमदार फारूख शाह यांनी पाहणी करून लवकरच नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले़
यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत ओगले यांना नव्याने उभारण्यात आलेल्या जामचा मळा येथील मुल्ला नगरातील जलकुंभातून प्रभागातील नागरिकांना लवकर पाणीपुरवठा कशा पध्दतीने करता येईल याबाबत सुचना दिल्यात़ यावेळी नगरसेवक युसुफ मुल्ला, हमिद शाह, युसुफ पिंजारी, हमिद शाह, इसुफ पिंजारी, हाजी कलीम शाह, आशीप शाह, सलीम हकी, असीप मोमिन, हिना पठाण, सद्दाम खान, शाब्बीर मन्सुरी आदी़ परिसरातील नागरिकांना अनेक महिन्यापासून नियमित पाणीपुरवठा होत नाही़ येथील जलकुंभ सुरू झाल्यास परिसरातील अनेक प्रभागात नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो़

Web Title: Inspection of aquamarine water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे