रंगलेला पत्त्यांचा डाव उधळला २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 22:09 IST2020-09-06T22:09:02+5:302020-09-06T22:09:24+5:30

कबीरगंज परिसर : सहा जणांना अटक

The innings of colored cards were ruined and 25,000 items were seized | रंगलेला पत्त्यांचा डाव उधळला २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

रंगलेला पत्त्यांचा डाव उधळला २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

धुळे : शहरातील कबीरगंज भागात परिसरात पत्त्याचा रंगलेला डाव चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उधळून लावला़ यात २५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली़
शहरातील कबीरगंज भागातील सत्तारच्या वाड्याच्या मागे असलेल्या झुडपांच्या आडोश्याला पैसे लावून पत्त्यांचा डाव सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांना मिळाली़ माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला़ पोलिसांनी सलीम खान अमीर खान (६२, गल्ली नंबर ६, देवपूर), कय्युम शेख अय्युब शेख (४८, गफ्फूर नगर, धुळे), हारुन हनिफ अन्सारी (५८, गल्ली नंबर ६, देवपूर), तारीक हुसेन अन्सारी (६०, माधवपुरा, पालाबाजार, धुळे), महेमुद हसन साबान अन्सारी (४७, कलंदर चौक, मौलवीगंज, धुळे), हुसनोद्दीन शमशोद्दीन काझी (५२, वडजाई रोड, गफ्फूर नगर, धुळे) या सहा संशयितांना अटक करण्यात आली़ त्यांच्याजवळून ३ हजार ९५० रुपये रोख, मोबाईल असा एकूण २५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपअधीक्षक सचिप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अजीज शेख, बी़ आय़ पाटील, प्रेमराज पाटील, अविनाश पाटील, सुशील शेंडे, नरेंद्र माळी, स्वप्निल सोनवणे, पाटील, पगारे यांनी ही कारवाई केली़

Web Title: The innings of colored cards were ruined and 25,000 items were seized

टॅग्स :Dhuleधुळे