मनपाकडून हद्दवाढीच्या गावांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 21:06 IST2020-11-07T21:05:26+5:302020-11-07T21:06:10+5:30
धुळे : शहरानजीक असलेल्या अकरा गावांचा मनपात समावेश झाल्यानंतर हद्दवाढीतील गावांचा विकास होऊन नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याची अपेक्षा नागिरकांची ...

dhule
धुळे : शहरानजीक असलेल्या अकरा गावांचा मनपात समावेश झाल्यानंतर हद्दवाढीतील गावांचा विकास होऊन नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याची अपेक्षा नागिरकांची होती. मात्र या गावातील खराब रस्ते, वीज पुरवठा, पथदिव्यांचा अभाव, गटारी, स्वच्छतेचा अभाव, पाणी टंचाई, वार्डातील मनपा कर्मचार्यांची मनमानी अशा समस्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. त्यामुळे मनपाकडून हद्दवाढ गावांवर अन्याय झाला आहे. गावांच्या विकास कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी बैठकीत सांगितले.
मनपात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढीतील गांवाच्या विकास कामांच्या संदर्भा शुक्रवारी नगरसेवक व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अजिज शेख, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, उपायुक्त शांताराम गोसावी, विनायक कोते, तुषार नेरकर, कैलास शिंदे, लक्ष्मण पाटील, महेंद्र परदेशी, चंद्रकांत उगले, भटू चौधरी, छोटू चौधरी, शिरीष सोनवणे, बापू खैरनार, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर मराठे, जगदिश चव्हाण, ऋषी ठाकरे, खंडू पाटील , चुनिलाल पाटील, प्रा. विजय देसले, विजय वाघ आणि दहा गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मनपाकडून ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, हा निधी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून गावांचा विकास कामे केली जाणार तसेच या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश आमदार पाटील यांनी दिले.
अवधान व पिंप्री गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी डेडरगाव तलावावरुन स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना दिल्यात.
७६ कर्मचारी समावेश करा
हद्दवाढ गावातील ग्राम पंचायतीचे तत्कालिन ७६ कर्मचाऱ्यांचे मनपात समावेश करून त्यांचे थकीत वेतनाचा प्रश्न सोडवावा. वडीलोपार्जित जागांवर ८ अ चा उतारा मिळणे, मालमत्तांची सिटी सर्व्हेमध्ये नाव नोंदणी करणे ही कामे मनपाकडून करण्यात यावी अशी मागणी बापू खैरनार, ऋषी ठाकरे यांनी केली.