धुळ्यात अ.भा.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास थाटात प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:28 IST2019-02-02T13:26:15+5:302019-02-02T13:28:19+5:30

दोनदिवसीय संमेलनात परिसंवादांसह विविध कार्यक्रम   

Initiated in the Dhule, the Swatantraveer Savarkar Sahitya Sammelan | धुळ्यात अ.भा.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास थाटात प्रारंभ 

धुळ्यात अ.भा.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास थाटात प्रारंभ 

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्याहस्ते उदघाटन अशोक मोडक लिखीत पुस्तकाचे प्रकाशन संमेलनास सर्वसामान्य नागरिकांसह मान्यवरांची उपस्थिती 

लोकमत आॅनलाईन 
धुळे : अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास येथे शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. या दोनदिवसीय संमेलनांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. 
महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने  गुरूद्वारासमोरील कान्हा रिजेन्सीत आयोजित या संमेलनाचे उदघाटन संमेलनाध्यक्ष दिलीप करंबेळकर, विनय सहस्त्रबुद्धे यांच्याहस्ते झाले. या प्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भिकुजी इदाते, महापौर चंद्रकांत सोनार, स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, सचिव हर्षल विभांडीक, संतोष अग्रवाल, मधुकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अशोक मोडक यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. 
उदघाटन प्रसंगी सभागृहात सर्वसामान्य नागरिकांसह अनेक मान्यवरही उपस्थित होते. त्यात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे, डॉ.माधुरी बाफना, माजी महापौर जयश्री अहिरराव, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, भाजपचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, प्रकाश पाठक, महेंद्र निळे, मदनलाल मिश्रा आदींचा समावेश आहे. 
या संमेलनात शनिवारी दुपारच्या दोन सत्रात ‘हिंदूत्वनिष्ठा आणि ऐत्तदेशीय’ आणि सावरकर आणि नाट्यसृष्टी या विषयावर परिसंवाद होणार आहेत. 

 

Web Title: Initiated in the Dhule, the Swatantraveer Savarkar Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे