मनपाच्या सर्व्हेक्षणात माहिती लपवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:51 IST2020-04-07T12:51:18+5:302020-04-07T12:51:36+5:30
चंद्रकांत सोनार । कोरोना रूग्णांचा शोध

dhule
धुळे : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे महानगरपालिकेमार्फत संपूर्ण शहरात प्रभागनिहाय कुटूंब सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात नागरीकांनी माहिती लपवू नये, सत्य माहिती द्यावी असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले.
मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की, कोरोना विषाणुंच्या प्रादुभार्वामुळे कुटुंबनिहाय सर्वेक्षण केले जात आहे़ त्या अनुषंगाने संपूर्ण शहरात केले जात असलेल्या सर्वेक्षणात कुटुंबाची पार्श्वभूमी तसेच कुटुंबातील सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण बाहेर गावाहून किंवा परदेशातून आलेले सदस्यांची माहिती द्यावी असेही महापौर सोनार यांनी सांगितले़ तर आयुक्त अजिज शेख यांनी सर्व्हेक्षणातील माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रभागनिहाय नियंत्रण अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी नियुक्ती केले आहे़ यावेळी सहायक आयुक्त शांताराम गोसावी दीपकांत वाघ यांनी मार्गदर्शन केले़